नवी मुंबई आतंरराष्ट्रीय विमानतळाचे मा. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण
मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण केले. तसेच आज पंतप्रधानांच्या हस्ते मुंबईतील पहिली पूर्णपणे भूमिगत असलेली मेट्रो एक्वा लाईन-3 च्या अंतिम टप्प्याचे उद्घाटन झाले. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर नेते उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आजपासून 3 दिवस महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्याच्या पहिल्या दिवशी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे आणि मेट्रो एक्वा लाईन-3 च्या अंतिम टप्प्याचे उद्घाटन झाले. नवी मुंबई विमानतळाचा पहिला टप्पा सुमारे 19650 कोटी रुपये खर्च करुन बांधण्यात आला आहे. हे विमानतळ पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यावर वर्षाला 90 दशलक्ष प्रवासी हाताळू शणार आहे. मुंबई महानगर क्षेत्रातील प्रवाशांसाठी हे दुसरे आंतरराष्ट्रीय विमानतळ असेल. या विमानतळामुळे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील ताण कमी होणार आहे.