इंग्रजी मराठी A- A A+ A++ HC रीसेट

महाभूसंपादन

नवी मुंबई विमानतळाबाबत सर्वात मोठी अपडेट! पहिल्या टप्प्यात 5 शहरांसाठी थेट विमानसेवा, कधीपासून होणार सुरुवात?

05/10/2025, जिल्‍हाधिकारी कार्यालय नांदेड

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. लवकरच हा विमानतळ प्रवाशांसाठी खुला होणार असून पहिल्या टप्प्यात पाच मोठ्या शहरांना जोडला जाणार आहे. यात नेमक्या कोणत्या शहरांचा समावेश असेल ते जाणून घेऊयात.
'या' शहरांचा असणार समावेश मिळालेल्या माहितीनुसार एअर इंडिया एक्सप्रेस या विमान कंपनीकडून नवी मुंबई विमानतळावरून दररोज दिल्ली, बंगळुरू, चेन्नई, हैद्राबाद आणि कोलकाता या पाच प्रमुख शहरांसाठी थेट विमानसेवा सुरू करण्यात येणार आहे. या माध्यमातून देशांतर्गत प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
पहिल्या टप्प्यात या विमानतळावरून 15 पेक्षा जास्त शहरांसाठी 20 फ्लाइट्स दररोज ऑपरेट केल्या जाणार आहेत. आगामी काळात म्हणजेच 2026 पर्यंत या संख्येत वाढ करून एकूण 55 फ्लाइट्स चालवल्या जातील, ज्यामध्ये पाच आंतरराष्ट्रीय उड्डाणांचा समावेश असेल. त्यामुळे नवी मुंबई विमानतळ हे देशातील एक महत्त्वाचे एव्हिएशन हब ठरणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे.

बातम्यांचे संग्रहण

अलीकडील बातम्या

नवी मुंबई आतंरराष्ट्रीय विमानतळाचे मा. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण
नवी मुंबई विमानतळाबाबत सर्वात मोठी अपडेट! पहिल्या टप्प्यात 5 शहरांसाठी थेट विमानसेवा, कधीपासून होणार सुरुवात?
महत्त्वाच्या प्रकल्पांचे भूसंपादन ठरलेल्या वेळेत करा - मा. मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी संबंधित सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना व जिल्हाधिकाऱ्यांना महत्त्वपूर्ण निर्देश दिले.
महत्त्वाच्या प्रकल्पांचे भूसंपादन ठरलेल्या वेळेत करा - मा. मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी संबंधित सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना व जिल्हाधिकाऱ्यांना महत्त्वपूर्ण निर्देश दिले.
गोपनीयता धोरण | अटी व शर्ती | कॉपीराइट धोरण | हायपरलिंक धोरण | मदत | अस्वीकरण | साइटमॅप | आमच्याशी संपर्क साधा
एकूण दर्शक: 10   |   आजचे दर्शक: 10   |   शेवटचे पुनरावलोकन: 22 Oct 2025